शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पोलीस उपायुक्त चावरिया आणि साकोरेंनी स्विकारला पदभार

By admin | Published: May 22, 2015 12:25 AM

फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये साकोरे आणि चावरिया नावाने

फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये साकोरे आणि चावरिया नावाने

पुणे : पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांच्या राज्य शासनाने नुकत्याच बदल्या जाहीर केल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी अधिकारी हजर होऊ लागले असून बुधवारी संध्याकाळी उपायुक्त अरविंद चावरिया आणि दीपक साकोरे यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये पदभार स्विकारला. चावरिया आणि साकोरे हे दोघेही १९९६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. चावरिया यांच्याकडे मुख्यालय (२) तर साकोरे यांच्याकडे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचा पदभार सोपवण्यात आला आहे.
चावरिया मुळचे जळगावचे आहेत. त्यांनी सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्येच उपअधीक्षकपदी काम केले. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीणमधील सिल्लोडचे उपअधीक्षकपदी त्यांची नेमणूक झाली. राज्य राखीव दलाचे कमांडंट (जालना), नवी मुंबई येथील मरोळ पोलीस प्रशिक्षन केंद्राचे उपप्राचार्य, परभणीचे अतिरीक्त अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीणचे अतिरीक्त अधीक्षक, बुलढाण्याचे अतिरीक्त अधीक्षक अशा जबाबदा-या पार पाडल्या आहेत. ते सध्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडल दोनचे उपायुक्त म्हणून काम करीत होते. औरंगाबादहून त्यांची बदली पुण्याला झाली आहे.
तर साकोरे यांनी यवतमाळ जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर धुळे, बार्शी (सोलापूर), इचलकरंजी येथे उपअधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर नवी मुंबईमध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले. त्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये अतिरीक्त अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोकण विभागाचे अधीक्षक म्हणून त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले. साकोरे सध्या औरंगाबाद येथील भारत राखीव बटालियन (आयआरबी) चे कमांडंट म्हणून काम करीत होते. तेथून त्यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे. साकोरे यांच्याकडे गुन्हे शाखेच्या आर्थिक आणि सायबर शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.