- हरीश गुप्तानवी दिल्ली : यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यासह महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणाºया केंद्रीय गृहमंत्रीपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.ही पदके देण्यास गेल्या वर्षीपासून प्रारंभ झाला. यंदा सीबीआयमधील पंधरा, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेशमधील १०, केरळमधील १०, मध्यप्रदेशमधील ८, दिल्ली व कर्नाटकातून ६ पोलीस अधिकाऱ्यांचा, तसेच उर्वरित केंद्रशासित प्रदेश व राज्ये व अन्य तपास यंत्रणांतील ३६ अशा देशभरातील ९६ पोलीस अधिकाºयांचा केंद्रीय गृहमंत्रीपदक देऊन गौरव करण्यात येईल. त्यामध्ये १३ महिला अधिकाºयांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील ११ मानकरीपोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, पोलीस निरीक्षक सागर शिवलीकर, पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन माने, पोलीस अधीक्षक प्रदीप भानुशाली.
पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांना केंद्रीय गृहमंत्रीपदकाचा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:39 AM