शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा थाट, राहायचा बुलेटप्रुफ घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 13:05 IST

बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली.

ठळक मुद्दे बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली.. राम रहीमला झेड प्लस सुरक्षा तर होतीच पण त्याचबरोबर राम रहीमचं घर 'तेरा वास' हे बुलेटप्रुफ असल्याचं समोर आलं आहे.

चंदीगड- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली. डेरामध्ये असलेल्या विविध गोष्टींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राम रहीमला झेड प्लस सुरक्षा तर होतीच पण त्याचबरोबर राम रहीमचं घर 'तेरा वास' हे बुलेटप्रुफ असल्याचं समोर आलं आहे. सिरसातील राम रहीम याच्या तीन मजली इमारतीते तसंच स्वच्छतागृहांचे दरवाजे आणि खिडक्या बुलेटप्रुफ होत्या तसंच एखाद्या राजमहालाप्रमाणे सर्व सोयी-सुविधा तेथे होत्या. गुरमीतच्या ड्रेसिंग रूममध्ये सामान ठेवायला 14 फुट उंचीचे 29 मोठी लाकडी कपाटं होती. सगळ्या खोल्या वातानुकूलित असून तेथे महागड्या फुलदाण्या, मोठमोठे टीव्ही आणि लक्झरी वस्तू होत्या.

पंजाब-हरियाणा हायकोर्टात सादर करण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार राम रहीमच्या मालमत्तेवर छापे मारण्यात आले. या छापेमारीत आयात केलेलं पिण्याचं पाणी, मसाज ऑईल, परफ्युम्स, कॉस्मेटीक प्रोडक्ट, शेकडो चपलांचे जोड, टोप्या, डिझायनर कपडे जप्त करण्यात आले. पोलिसांच्या या छापेमारीत पोलिसांना बुलेटप्रुफ लेक्सस  (DL8CAB-4587), दोन मोठ्या बॅगांमध्ये 56 हार्ड डिस्क्स, हार्ड डिस्क असलेले सहा प्रोजेक्टर, पेन ड्राइव्ह आणि वॉकी-टॉकीचे सेट्स सापडले. 

साध्वीवरील बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेल्या राम रहीमच्या या अलिशान घरात मोठे स्टुडिओ, ड्रेसिंग रूम, मुझ्यिअम आणि मीटिंग रूमही आहेत. पोलिसांच्या पथकाला राम रहीमच्या घरातून कुठल्याही स्फोटक वस्तू सापडल्या नाहीत. राम रहीमच्या घरातील पहिला मजल्यावर एक खोली सापडली ती खोली थेटे राम रहीमच्या खोलीला जोडली जाते. या खोलीची खिडकी एका लाकडी कपाटाच्या मागे लपवण्यात आली. तसंच राम रहीमच्या खोलीतून साध्वींच्या हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी एक भिंत असल्याचं शोध पथकातील एका व्यक्तीने सांगितलं. 

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाPoliceपोलिस