बलात्काराच्या आरोपाखाली सुनारिया तुरूंगात असलेल्या डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला आता उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल आलं आहे. गुरमीत राम रहीम यानं पोटदुखीची तक्रार केली होती. यानंतर मेदांता रुग्णालयात गुरमीत राम रहीम याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
गुरमीत राम रहीम यानं पोटदुखीची तक्रार केल होती. त्यानंतर पीजीआय रोहतकमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या ठिकाणी त्याचं सिटी स्कॅन, एन्जिओग्राफी आणि फायब्रोस्कॅन करण्यात आलं. रोहतक पीजीआयनं त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला एम्स रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नाही. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं त्याला मेदांता रुग्णालात नेण्याचा सल्ला दिला.सुनारिया तुरुंगाचे सुप्रिटेंडंट सुनिल सांगवान यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरमीत राम रहीमवर पीजीआयमध्ये उपचार सुरू होती. परंतु त्याच्या काही चाचण्या करायच्या होत्या. त्या पीजीआयमध्ये उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्याला चाचणीसाठी गुरुग्राम येथे नेण्यात आलं. यापूर्वी ३ जून रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्याला पीजीआय रोहतकमध्ये आणण्यात आलं होतं. तपासणी केल्यानंर त्याला पुन्हा पाठवण्यात आलं. यापूर्वी १२ मे रोजीही गुरमीत राम रहीमला कोरोनाच्या शक्यतेवरून मोठ्या सुरक्षेच्यादरम्यान पीजीआय रोहतकमध्ये दाखल करण्यात आलं होतं.