शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 1:43 PM

कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ कारवाई करण्याची सूचना

नवी दिल्ली- भारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे.

मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्यासंदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.

टॅग्स :marriageलग्नWomenमहिलाwomen and child developmentमहिला आणि बालविकासIndiaभारत