शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

मंत्री असतानाही सुरेश शेट्टी यांनी जपले अंधेरीकरांशी नाते

By admin | Published: October 10, 2014 2:51 AM

साधे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी त्या अध्यक्षाला वेळ नसतो.

अमर मोहिते, मुंबईसाधे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी त्या अध्यक्षाला वेळ नसतो. मात्र राज्याचे मंत्रिपद भूषवल्यानंतरही सुरेश शेट्टी यांचे अंधेरीकरांशी जिव्हाळ्याचे संबंध अगदी तसेच आहेत.हे नाते इतके घट्ट आहे, की प्रचार रॅलीत एक माजी मंत्री नागरिकांशी संवाद साधतो आहे असे जाणवतही नाही तर सामान्य माणसांतीलच कोणी सदिच्छा भेटीसाठी आला आहे, असेच मतदारांना वाटते. शेट्टी हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. शेट्टी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम करत छाप सोडली आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे़ त्यात आघाडी व युतीमध्ये फूट पडल्याने या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अखिलेश सिंग यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेकडून रमेश कोटक तर भाजपाकडून सुनील यादव व मनसेकडून संदीप दळवी यांना उमेदवारी मिळाली आहे़शेट्टी यांनी मंत्री म्हणून राज्यासाठी काम करताना कधीही अंधेरीकडे दुर्लक्ष केले नाही़ अंधेरीकरांना पायाभूत सुविधांपासून सर्वच सुविधा देण्यासाठी ते सदैव उपलब्ध होते. त्यामुळे शेट्टी यांना प्रचारासाठी घरोघरी जाण्याची आवश्यकताच नव्हती़ त्यांचा चेहरा आणि त्यांची विकासकामेच त्यांच्या प्रचारासाठी पुरेशी आहेत़ तरीही शेट्टी प्रचारासाठी घरोघरी जात आहेत़ अन्य उमेदवारांप्रमाणे त्यांच्या प्रचाराची आखणी आदल्या दिवशीच झालेली असते़ त्यांच्या प्रचाराची रणधुमाळी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एक दिवस त्यांच्यासोबत घालवला़प्रचार करताना शेट्टी यांच्यातील ऊर्जा व त्यांना मिळणारा जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता मंत्रिपद भूषवणारा नेता नागरिकांशी कसा जोडलेला असावा, याचे उत्तम उदारहण बघायला मिळते. कारण लिफ्ट नसलेल्या पाच मजली इमारतीत अगदी शेवट्या मजल्यावर कार्यकर्त्यांच्या आधी ते पोहोचतात. तेथे पोहोचून मतदारांची थेट गळाभेट घेत शेट्टी नाते अधिक दृढ करतात. एवढेच काय तर प्रचार फेरीत नागरिकांशी मनमोकळेपणाने भेटून त्यांच्याशी ते संवाद साधतात. सर्वसाधारणपणे उमेदवार मला किंवा पक्षाला मदत करा, असे आवाहन मतदारांना करतो़ शेट्टी यांच्याबाबत काहीशी याउलट परिस्थिती आहे़ शेट्टी भेटल्यानंतर नागरिकच स्वत: त्यांना सांगतात, साहेब, आम्ही तुमची साथ कधीच सोडणार नाही़ विशेष म्हणजे गुरुवारी शेट्टी यांची पंप हाऊस विभागात प्रचार रॅली होती़ या विभागात हिंदू व मुस्लीम समाजाचे मतदार बहुसंख्येने राहतात़ हंजर नगर व जनशक्ती नगर हे तर समोरासमोर असणारे विभाग आहेत़ आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही विभागांत शेट्टी यांचे जोरदार स्वागत झाले़ शेट्टी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी मुस्लीम समाजाचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नागरिक, महिला व अगदी लहान मुले व मुली स्वत:हून पुढे येत होते़ जनशक्ती नगरपासून असलेल्या झोपडपट्टी विभागात तर घराघरांत येण्याचे शेट्टी यांना आमंत्रण मिळत होते़ पण या दोन्ही ठिकाणी शेट्टी यांना मला मतदान करा, असे आवाहन करावे लागले नाही़ येथे मतदारांनी स्वत: त्यांना सांगितले की, ‘साहेब, आम्ही तुमच्याचसोबत आहोत़’शेट्टी यांच्या प्रचारातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रचार रॅलीत गाड्यांचा ताफा कमी तर कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता़ त्यात महिलांची संख्या तर लक्षणीय होती़ हे सर्व कार्यकर्ते शेट्टी यांच्याशी मनापासून जोडलेले दिसले़शेट्टी यांचा प्रचाराचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो़ नाश्ता झाल्यानंतर आठ वाजल्यापासून ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात़ भेटी संपल्यावर ते प्रचार रॅलीला सुरुवात करतात़ रॅली संपल्यावर पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच असतो. दुपारी या भेटीगाठीतच ते जेवण उरकत थोडाही आराम न करताच ते पुन्हा प्रचार सुरु करतात़ आणि सायंकाळी सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे वडापाव खाऊन त्यांची पदयात्रा सुरूच असते. रात्री उशिरापर्यंत पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा़़़ त्यांचा हा दिनक्रम एखाद्या तरुण उमेदवारालाही लाजवणारा आहे़