नवी दिल्ली : ‘मोठी आडनावे’ असलेल्यांनी देशावर राज्य केले; परंतु उत्तम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक संसाधने असूनही देश प्रगती करू शकला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली. पूर्वी पक्षांच्या मतपेट्यांना फटका बसेल म्हणून दारिद्र्य निर्मूलन झाले नसल्याचा आरोपही मोदी यांनी केला.‘जागरण फोरम’मध्ये नेहरू-गांधी कुटुंबांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून मोदी म्हणाले की, मोठी आडनावे असलेले लोक सत्तेत आले आणि गेलेही; परंतु प्रश्नांना उत्तरे सापडलेली नाहीत.
‘बुद्धिमत्ता असूनही देशाची प्रगती नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 4:30 AM