नवी दिल्ली - टीव्ही आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंग करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी फेस मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
कलाकारांवर या सूचना लागू होणार नाहीत. मार्गदर्शक सूचनांनुसार सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्य ते अंखर राखावे लागणार आहे. रेकॉर्डिंग स्टूडिओ, एडिटिंग रूमध्ये देखील सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच सध्या सेट्सवर प्रेक्षकांना जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
नव्या मार्गदर्शक सूचना
- कॅमेऱ्यासमोरील कलाकार सोडून सर्वांसाठी फेस कव्हर्स/मास्क अनिवार्य आहे
- प्रत्येक ठिकाणी 6 फुटांच्या अंतराचे पालन करावे
- मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टायलिस्ट्स पीपीईचा वापर करावा लागणार आहे.
- विग, कॉस्ट्यूम आणि मेकअप कमीत कमी शेअर करावं.
- शेअर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्ह्जचा वापर करावा.
- माइकच्या डायफ्रामशी थेट संपर्क ठेवू नये
- प्रॉप्सचा कमीतकमी वापर व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक आहे.
- शूटिंगवेळी कास्ट अँड क्रू कमीतकमी असावेत.
- शूट लोकेशनवर एंट्री/एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत.
- व्हिजिटर्स/ दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी नाही.
प्रकाश जावडेकर यांनी एसओपी शूटिंगची स्थाने आणि इतर कामाच्या ठिकाणी योग्य ते अंतर राखले जाणे अत्यंत आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. तसेच योग्य स्वच्छता, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षात्मक उपकरणांसाठी तरतुदींसह उपायांचा समावेश आहे. कमीत कमी संपर्क, एसओपीमध्ये मूलभूत आहे असं ट्विट जावडेकर यांनी केले आहे. हेयर स्टायलिस्टांद्वारे पीपीई, प्रॉप्स कमीतकमी शेयर करणे आणि मेकअपबाबत कलाकारांद्वारे विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा', रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी
CoronaVirus News : स्वत:वर कोरोना लसीची चाचणी करायचीय?, 'या' आहेत अटी, जाणून घ्या नेमकं कसं असणार?
काय सांगता? समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील धक्कादायक घटना
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद
CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम