शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
3
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
5
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
6
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
7
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
8
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
9
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
10
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
11
बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य
12
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...
13
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...
14
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
15
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
16
Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!
17
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
18
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
19
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
20
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना

गुप्तचर व दहशतवादी विरोधी पथकाकडून जिल्‘ात चाचपणी

By admin | Published: February 22, 2016 12:02 AM

जळगाव: पुणे येथील कसारखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्बस्फोट घडविणार्‍या दहशतवाद्यांपैकी शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०) याचे जळगावशी कनेक्शन उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून जळगाव, भुसावळ व मुक्ताईनगर येथे जावून चाचपणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जळगाव: पुणे येथील कसारखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्बस्फोट घडविणार्‍या दहशतवाद्यांपैकी शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०) याचे जळगावशी कनेक्शन उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून जळगाव, भुसावळ व मुक्ताईनगर येथे जावून चाचपणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नाशिक व पुणे येथील काही अधिकार्‍यांनी जळगावात भेटी दिल्याची माहिती समोर येत आहेत. स्थानिक युनीटच्या मोजक्याच लोकांना या मोहीमेत सहभागी करुन घेण्यात आले होते. येथून माहिती संकलित करुन ती वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. शेख मेहबूब याचे भुसावळ व मुक्ताईनगर येथे आजही मामा व जवळचे नातेवाईक वास्तव्याला आहेत.शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०),अमजद रमजान खान (वय ३५), झाकीर हुसैन बद्रुल हुसैन उर्फ सादीक (वय ३३ तिन्ही रा.गणेश तलाई, खंडवा, मध्य प्रदेश) व मोहम्मद सलिक उर्फ सल्लू अब्दुल हकीम (वय ३२ रा.गुलशन नगर खंडवा) आदींना गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व पोलिसांनी ओडीशातून अटक केली होती. जळगाव न्यायालयात सुरु आहे सिमीचा खटलाजळगाव जिल्हा हा सिमीचा अड्डा असल्याने अधूनमधून गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून संवेदनशील भाग व त्यांच्या हालचाली असलेल्या भागात जावून चाचपणी केली जाते. जळगाव न्यायालयात सुरु असलेला सिमीचा खटला हा अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे यंत्रणांनी जळगाववरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. जळगाव-औरंगाबाद कनेक्शनयेथील सिमीचे कार्यकर्त्यांचे शेजारी असलेल्या औरंगाबादशी कनेक्शन असल्याचा संशय यंत्रणांना आहे, त्यामुळे एकाच वेळी या दोन्ही शहरातील हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. जळगावात आजही सिमीच्या गुप्त बैठका घेतल्या जातात. नागपुर बॉम्बस्फोटातील संशयित शेख मुश्ताक शेख शफी हा मुळचा जळगावचा आहे, माथ सध्या तो फरार आहे.