शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

बापरे! दुधावरची साय झाली गायब अन् सापडलं डिटर्जंट; घरबसल्या 'अशी' ओळखा दुधातील भेसळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 5:37 PM

दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

नवी दिल्ली - बाजारात अनेकदा आपल्याला भेसळयुक्त वस्तू पाहायला मिळतात. दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दूधवाल्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. दुधात पाण्यासोबतच डिटर्जंट देखील आढळून आले आहे. जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात दुधाची 207 सॅम्पल घेण्यात आली. त्यापैकी 144 सॅम्पलचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 56 सॅम्पल फेल झाली आहेत. 16 सॅम्पलमध्ये डिटर्जंटचे अंश आढळून आले आहेत. तर 40 सॅम्पलमधून दुधाची साय गायब होती. 

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना धीरान यांनी याबाबत माहिती दिली आहे.विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा दुधाचा पुरवठा कमी होतो तेव्हा मागणी पूर्ण करण्यासाठी दुधात पाण्याची आणि डिटर्जंटची भेसळ वाढते. दुधाचे नमुने वेळोवेळी घेतले जातात. दुधाचे महत्त्व लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. घरबसल्या आपण स्वतः दुधाची चाचणी करू शकता जाणून घेऊया...

घरी अशी करा दुधाची चाचणी 

एखाद्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर दूधाचा एक थेंब टाकला तर तो थेंब घरंगळत पुढे जातो आणि मागे त्याच्या पांढऱ्या खुणा दिसतात. परंतु, जर दुधात पाणी मिसळलेलं असेल तर ते दूध लवकर घरंगळत पुढे जातं आणि पांढऱ्या खुणा दिसत नाहीत. 

टिंक्चर आयोडिनचे (Tincture Iodine) काही थेंब टाकल्यावर स्टार्च असलेल्या दुधाला निळा रंग येतो. टिंक्चर आयोडिन औषधाच्या दुकानात सहज मिळतं.

दुधात युरियाच्या भेसळीची तपासणी करण्यासाठी परीक्षानळीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर टाकून पाच मिनिटं ठेवा. यानंतर लाल लिटमस पेपर (Red litmus paper) दुधात बुडवल्यानंतर लाल कागदाचा रंग निळा झाल्यास दुधात युरियाची भेसळ असल्याचं स्पष्ट होतं. स्टेशनरीच्या दुकानात रेड लिटमस पेपर मिळतो.

दुधात तेलाची भेसळ तपासण्यासाठी एका परीक्षानळीमध्ये तीन ते पाच मिलिलिटर दूध घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे 10 थेंब आणि एक चमचा साखर (Sugar) टाका. पाच मिनिटांनी त्यात लाल रंग दिसू लागल्यास दुधात भेसळ केल्याचं स्पष्ट होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :milkदूधUttar Pradeshउत्तर प्रदेश