काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा निर्धार; स्थापन करणार नवा पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 09:39 AM2022-09-05T09:39:11+5:302022-09-05T09:39:52+5:30
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.
जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देणारजम्मू : काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरच्या खोऱ्यात आणून त्यांचे पुर्नवसन करणे, नागरिकांच्या जमीन व नोकरीविषयक हक्कांचे रक्षण ही कामे आझाद हाती घेणार आहेत. आझाद नवीन पक्ष स्थापन करणार असून, अद्याप त्याचे नाव ठरविलेले नाही.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी घेतलेली ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेत आझाद म्हणाले की, जनतेशी तसेच जन्मू-काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करून माझ्या नव्या पक्षाचे नाव ठरविणार आहे. हे नाव मौलानांच्या उर्दूमधील किंवा पंडिकांच्या संस्कृतमधील नसेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सभेत व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, काही माजी मंत्री, पीडीपीचे माजी आमदार सईद बशीर, अपनी पार्टीचे नेते शोएब नबी लोन आदी मान्यवर उपस्थित होते.
काश्मीरची जनता ठरविणार पक्षाचे नाव -
- गुलाम नबी आझाद म्हणाले की, माझ्या नव्या पक्षाबद्दल दिल्लीत बसून मी आदेश काढणार नाही. जम्मू-काश्मीरचे नेते व जनतेशी संवाद साधून मी नव्या पक्षाची ध्येयधोरणे व नाव नक्की करणार आहे.
- माझ्या पक्षाचे नाव अतिशय सोपे असेल. जम्मू-काश्मीरच्या मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी लोकांनी आमच्या पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन गुलाम नबी आझाद यांनी केले.
‘बाहेरच्या लोकांना काश्मीरमध्ये नोकऱ्या देऊ नका’ -
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.