शांतता क्षेत्र निश्चित करा राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM
शांतता क्षेत्र निश्चित करा
शांतता क्षेत्र निश्चित कराराष्ट्रीय हरित लवादाचे निर्देशमुंबई : मुंबईमधील शांतता क्षेत्र निश्चित करण्यासह परवानगीशिवाय वाजविण्यात येणारे लाऊडस्पीकर्स ताब्यात घेण्यात यावेत; असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने राज्याला दिले आहेत. न्यायमूर्ती व्ही.आर. किणगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले असून, पोलीस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकारने चार आठवडयात शांतता क्षेत्र निश्चित करण्याबाबत पाऊले उचलावीत, असे म्हटले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद इश्तियाक बागबान यांनी दिलेल्या तीन वर्षांच्या लढयानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. क्रॉफर्ड मार्केट परिसरात वास्तव्य करणार्या बागबान यांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडे ध्वनी प्रदूषणाच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र कार्यवाही काहीच होत नव्हती. परिणामी त्यांनी उत्सव अथवा कार्यक्रमासाठी आयोजकांना देण्यात येणार्या परवान्यांबाबत माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज दाखल केले. दरम्यानच्या कालावधीत काम सुरु असताना यंत्रणेलादेखील अनेक नियम माहित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आवाज मोजणार्या यंत्रणा व्यवस्थिरित्या कार्यरत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्यांना स्थानिक लोकांसह अनेक आयोजकांकडून त्रासही झाला. परिणामी त्यांनी याविरोधात आणखी जोमाने लढा देण्यासह राष्ट्रीय हरित लवादाचे दार ठोठावल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, यासंबधी आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले की, हे प्राथमिक निर्देश आहेत. आणि मुळात मुंबईत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. परंतू या निर्देशामुळे आता ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र नाहीत आणि ती क्षेत्र शांतता क्षेत्र व्हावीत, असे लोकांना वाटत असेल तर त्यांना महापालिकेकडे अपील करता येईल. एका अर्थाने या निर्देशामुळे शांतता क्षेत्रातील शांतता टिकून राहण्यासाठी मदतच होणार आहे. (प्रतिनिधी)...................