शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

Dev Joshi SpaceX Moon Trip: 'बालवीर'ची चंद्रवारी; DearMoon प्रोजेक्टमध्ये झाली निवड, अशी मिळाली संधी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:41 IST

Dev Joshi SpaceX Moon Trip: मुलांचा आवडता सूपरहिरो 'बालवीर' म्हणजेच देव जोशी चंद्रावर जाणार आहे. जापानच्या उद्योगपतीने त्याला ही संधी दिली आहे.

Dev Joshi SpaceX Moon Trip: लहानपणापासून चंदा मामा म्हणजेच चंद्राबद्दल अनेक कथा मुलांना सांगितल्या जातात. चंदा मामा प्रत्येकाच्या मनाच्या जवळ आहे. पण खऱ्या आयुष्यात जर एखाद्याला चंद्रावर जाण्याची संधी मिळाली तर बातच न्यारी... तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण टीव्हीचा प्रसिद्ध शो 'बालवीर'चा अभिनेता देव जोशी याला चक्क चंद्रावर जाण्याची संधी मिळाली आहे.

देव चंद्रावर फिरायला जाणार...ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण पण हे सत्य आहे. मुलांचा सर्वात आवडता आणि टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो बलवीरमध्ये बालवीरची भूमिका साकारणारा अभिनेता देव जोशी चंद्रावर जाणार आहे. खुद्द देव जोशी यानेच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे.

अशी मिळाली संधी?जापानी उद्योगपती युसाकू माएझावा यांनी चंद्रावर जाण्यासाठी ट्रिप प्लॅन केली आहे. चंद्राच्या सहलीला जाण्यासाठी युसाकू माएझावाने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. चंद्रावर जाण्यासाठी लाखो लोकांनी अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यापैकी केवळ 10 जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे बालवीर फेम अभिनेता देव जोशी. चंद्रावर फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये देव जोशी याचेही नाव आहे. देव 'डिअर मून' प्रोजेक्टचा क्रू मेंबर असेल.हे सर्व निवडक लोक 2023 मध्ये मून वॉकसाठी रवाना होतील. ही सहल आठवडाभराची असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय चाचणीनंतर या सहलीसाठी सर्व लोकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

काय म्हणाला देव जोशीचंद्रावर जाण्याची संधी मिळाल्यामुळे देव जोशी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, 'मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही भावना सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. असाधारण, अविश्वसनीय, #DearMoon प्रकल्पाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आयुष्याने मला नेहमीच नवीन संधी देऊन आश्चर्यचकित केले आहे आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट आहे.'

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनJara hatkeजरा हटकेJapanजपान