शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

Devendra Fadanvis: भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली, फडणवीसांचा शिवसेनेवर वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 5:45 PM

Devendra Fadanvis: देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे

नाशिक - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर, चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली. तर, नाशिक दौऱ्यात शिवसेनेला टोलाही लगावला.

देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भगव्या झेंड्याचे रक्षण करून समाजाला न्याय देण्यासाठी सतत झगडत राहू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. नाशिक येथे भाजपाच्या कार्यकर्ता मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे बाण चालवले. आज काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळे कामे सुरू केले आहे परंतु, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली. 

राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकार हे मुंबईबाहेर कुठेही लक्ष देण्यास तयार नाही. तीन पक्षांचे सरकार आहे, परंतु त्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. आज कोणत्याही विकासात्मक कामांवर निर्णय होत नाहीत, याचा खेद वाटत आहे. राज्य सरकार हे फक्त मुंबईपुरतं मर्यादित राहिले आहे, असा टोला देखील फडणवीसांनी यावेळी लगावला.

चंद्रशेखर राव मलाही बेटले होते. 

एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

आघाडी सरकार सुडाचे राजकारण करतेय

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. यावर बोलताना, हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दररोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहेत. सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा