राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेतेही भेटीला रवानासूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे Eknath Shinde असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, अमित शाह सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 2:36 PM