देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचं जाणकारांनी म्हटलं होतं. दरम्यान, केंद्र सरकारनं व्यापक प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण केंद्र सरकारद्वारे करण्यात येत होतं. परंतु २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरम्यान, आता भारतानं विक्रमी लसीकरण केलं आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.
भारतानं नुकतंच ३२३,६६ दशलक्ष लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. हे लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. यासंदर्भातील एक फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "होय मी भक्त आहे, अन् मला अभिमान आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या.