शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

बाॅम्बच्या धमक्यांमुळे विमान प्रवासाची बोंबाबोब; DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:03 AM

आणखी २० विमानांचे इमर्जन्सी लॅंडिंग; गृहमंत्रालयाला हवा अहवाल

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशात प्रवासी विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी २४ विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या. त्यापैकी २० विमानांचे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवडाभरात ९० पेक्षा जास्त विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या असून, त्यामुळे सुमारे २०० काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डीजीसीएप्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी केली आहे.

गृहमंत्रालयाला हवा अहवाल

बाॅम्बच्या धमकीचे प्रकार थांबत नसल्यामुळे गृहमंत्रालयाने सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीला तसेच विमान वाहतूक मंत्रालय तसेच नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागालाही सविस्तर अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.  

लँडिंगचे सत्र कायम

एअर इंडिया, इंडिगाे आणि विस्ताराच्या प्रत्येकी सहा विमानांत बाॅम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली हाेती. मुंबई, इस्तंबूल, अहमदाबाद, जाेधपूर, फ्रॅंकफर्ट, सिंगापूर, बागडाेगरा इत्यादी शहरांकडे ही विमाने झेपावली हाेती. धमकीनंतर आपत्कालीन लॅंडिंग करावे लागले.

बेळगाव विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकीnबेळगाव : विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे बेळगाव विमानतळावर एकच धावपळ उडवून युद्धपातळीवर तपासकार्य हाती घेण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. nसुरक्षा यंत्रणेने विमानतळाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी करूनदेखील आक्षेपार्ह काहीच आढळले नसल्याने विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

विमान बॉम्बने उडविण्याची टिश्यू पेपरवर धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उदयपूर ते मुंबई (युके ६२४) या विमानात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका टिश्यू पेपरवर ‘जहाज में बॉम्ब है. १३:४८ को फटेगा, बचालो’ असा मजकूर आढळल्याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर विमानाची तातडीने झाडाझडती घेण्यात आली. मात्र, सुरक्षा यंत्रणांना विमानात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काही दिवसांत विमानात बॉम्ब असल्याच्या अफवांनी यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळBombsस्फोटके