धमाल उन्हाळी शिबिर-२०१५ ची धमाल सुरुवात लोकमत बाल विकास मंच व श्री समर्थ पब्लिक स्कूलचा उपक्रम
By admin | Published: April 18, 2015 1:43 AM
अकोला - लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित धमाल उन्हाळी शिबिर - २०१५ ची धमाल गेल्या तीन दिवसांपासून श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे सुरू आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी शिबिराला हजेरी लावत आहेत. दहा दिवसीय या उन्हाळी शिबिरात नामवंत प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात सकाळीच प्रथम भारती शेंडेच्या योगाभ्यासाने शिबिराची सुरुवात होत असून, त्यानंतर आकाश गावंडे नाट्य अभिनयाची धमाल करवितात. तसेच पूनम केकन सोबत विद्यार्थी नृत्याचा जल्लोष करतात. प्रा. जितेंद्र डहाके सोबत विद्यार्थी चित्रकला आणि क्राफ्टच्या मनोरंजक दुनियेत रममान होतात. तर रुतूजा पाटखेडकर या विद्यार्थ्यांना गायन शिकवीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॅलीग्राफीची कला शिकवित आहेत. स्नेहा गवई, तसेच सर्व शिबिरार्थींना प्रा. संदीप खरे खगोलीय दुर्बिणीने आकाश दर्शन घडविणार आहे
अकोला - लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित धमाल उन्हाळी शिबिर - २०१५ ची धमाल गेल्या तीन दिवसांपासून श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे सुरू आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी शिबिराला हजेरी लावत आहेत. दहा दिवसीय या उन्हाळी शिबिरात नामवंत प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात सकाळीच प्रथम भारती शेंडेच्या योगाभ्यासाने शिबिराची सुरुवात होत असून, त्यानंतर आकाश गावंडे नाट्य अभिनयाची धमाल करवितात. तसेच पूनम केकन सोबत विद्यार्थी नृत्याचा जल्लोष करतात. प्रा. जितेंद्र डहाके सोबत विद्यार्थी चित्रकला आणि क्राफ्टच्या मनोरंजक दुनियेत रममान होतात. तर रुतूजा पाटखेडकर या विद्यार्थ्यांना गायन शिकवीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॅलीग्राफीची कला शिकवित आहेत. स्नेहा गवई, तसेच सर्व शिबिरार्थींना प्रा. संदीप खरे खगोलीय दुर्बिणीने आकाश दर्शन घडविणार आहेत. आणखी २४ एप्रिलपर्यंत या शिबिरात विद्यार्थ्यांकरिता भरपूर धमाल घेऊन येणार आहोत. धमाल उन्हाळी शिबिराच्या आयोजनाबद्दल पालक लोकमत बाल विकास मंच व श्री समर्थ पब्लिक स्कूलचे कौतुक करीत आहेत. फोटो : १८सीटीसीएल 31 ते 38 बालविकास मंच व समर्थ स्कूलचा लोगो घेणे. - लोगो : १८ सीटीसीएल ३९