शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 3:16 PM

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

अयोध्या-

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. अयोध्या विकास प्राधिकरणानं (ADA) नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत धन्नीपुर गावात मशिदीच्या कामाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. 

डीएम आणि एडीएचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार काही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मशिदीचा मंजूर लेआउट पुढील काही दिवसांत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे (SCWB) सुपूर्द केला जाईल. 

एससीडब्ल्यूबीने याबाबत रमजाननंतर बैठक बोलावणार असल्याचे म्हटले आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) नावाचा ट्रस्ट SCWB ने धन्नीपूर येथील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केला आहे. त्याचे सचिव अथर हुसेन म्हणाले की, "आम्ही रमजाननंतर एक बैठक बोलवू जिथे आम्ही बांधकाम सुरू करण्याच्या योजनेला अंतिम रूप देऊ" याच बैठकीत मशीद संकुलाचे बांधकाम सुरू करण्याची अंतिम तारीखही निश्चित करणार आहोत. रमजानचा पवित्र महिना २२ मार्चपासून सुरू होऊन २१ एप्रिलला संपण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं दिला होता निकालसुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येत १६व्या शतकातील बाबरी मशीद ज्या ठिकाणी उभी होती आणि कारसेवकांनी ती पाडली त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली. कोर्टाने याच निकालात सरकारला बाबरी मशिदीच्या जागी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत पाच एकरांचा मुख्य आणि योग्य भूखंड देण्यास सांगितले होते.

मशिदीला मौलवी फैजाबादी यांचे नाव देण्यात येणारSCWB ने म्हटले आहे की ते नव्याने बांधलेल्या मशिदीला ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडलेल्या वादग्रस्त १६व्या शतकातील मशिदीशी जोडू इच्छित नाहीत. त्यामुळे मशिदीला कोणत्याही मुघल बादशाहाचे नाव दिले जाणार नाही. अतहर हुसेन म्हणाले की, मशीद आणि संकुलाला स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारी मौलवी अहमदउल्ला शाह फैजाबादी यांचे नाव देण्यात येईल. त्यात मशीद, हॉस्पिटल, कम्युनिटी किचन आणि म्युझियमचा समावेश असेल.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालयही बांधणारहॉस्पिटलला जास्तीत जास्त जागा दिली जाईल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय विकसित करण्याची आमची योजना आहे. संपूर्ण रुग्णालय दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० खाटांची भर पडणार आहे. कॅन्सर केअर, ट्रान्सप्लांट, स्पाइन, कार्डियाक, रोबोटिक्स, ऑर्थोपेडिक्स, इमर्जन्सी आणि इतर अनेक बाबतीत हे हॉस्पिटल सर्वोत्तम उपचार देईल.

सल्लागार क्युरेटर म्हणून पुष्पेश पंत यांची नियुक्तीट्रस्टच्या वतीने मशिदीची रचना करण्यासाठी प्राध्यापक एसएम अख्तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ट्रस्टने प्रसिद्ध इतिहासकार, आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञ आणि भारतीय पाककृतीचे इतिहासकार प्रोफेसर पुष्पेश पंत यांची मशिदी संकुलाचा एक भाग असलेल्या अभिलेख संग्रहालयाचे सल्लागार क्युरेटर म्हणून नियुक्ती केली आहे.

२ हजार लोक एकत्र नमाज अदा करू शकतीलमशीद गोलाकार आकाराची असेल आणि एका वेळी २,००० जणांना सामावून घेण्याची क्षमता असेल. बाबरी मशिदीपेक्षा ती चौपट मोठी असेल. रुग्णालयाचे संकुल मशिदीच्या सहापट आकाराचे असेल. मशीद ३,५०० चौरस मीटर जागेवर बांधली जाईल तर रुग्णालय आणि इतर सुविधा २४,१५० चौरस मीटर क्षेत्रफळावर असतील. मशिदीतील विजेच्या सर्व मागण्या सोलर पॅनेलच्या मदतीने पूर्ण केल्या जातील आणि वीज कनेक्शन नसेल. प्रकल्पासाठी निधी गोळा करण्यासाठी अद्याप कोणतीही तपशीलवार योजना नाही. बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी दोन स्वतंत्र बँक खाती तयार करण्यात आली आहेत - एक मशिदीसाठी आणि दुसरे इतर संरचनांसाठी.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या