शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

धारावीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By admin | Published: September 26, 2014 2:24 AM

धारावी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे

तेजस वाघमारे, मुंबईधारावी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार बाबूराव माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांकडे आपली नाराजी व्यक्त करत मातोश्रीवर धाव घेतली. परंतू गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा शुक्रवारी मातोश्रीवर बोलविण्यात आले आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारणारे माजी आमदार बाबूराव माने यांना धारावी मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी माने यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असताना मातोश्रीवरुन माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माने यांच्याऐवजी इतर इच्छुकांना संधी देण्यात यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. याविषयी नाराज पदाधिकाऱ्यांनी विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.सरवणकर यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत शिवाजी पार्क परिसरात नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही नाराजांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. गुरुवारी ठाकरे तुळजाभवानी येथे असल्याने चर्चा होऊ शकली नाही. नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना शुक्रवारी मातोश्रीवर बोलविण्यात आले आहे.शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी हे धारावीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. परंतू माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. माने यांच्या उमेदवारीवरुन काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी अद्याप कोणी राजीनामा दिला नसल्याचे, सुर्यवंशी यांनी सांगितले. याबाबत शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.धारावीतील नाराज पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत मनधरणी करण्यात आली. काही जण नाराज असले तरी त्यांची मनधरणी करु, असे विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी सांगितले.