धरणगावचा धरणीनाला बनला दुर्गंधीयुक्त
By admin | Published: March 28, 2015 1:43 AM
धरणी चौकातून जातो धरणीनाला
धरणी चौकातून जातो धरणीनालावाहते पाण्याचा अभावाने दुर्गंधीचे वातावरणपरिसरातील नागरिक करतात कचरा-घाण टाकण्यासाठी नाल्याचा उपयोगपरिसरात दुर्गंधीचे घाणीचे साम्राज्यनागरिकांचे आरोग्य धोक्यातधरणगाव शहर दाट वस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. यातील अनेक चौकापैकी धरणी चौक हा गजबजलेला चौक म्हणून प्रसिद्ध आहे. या चौकात नेहमी गर्दी व वर्दळ असते. यातूनच एक मोठा नाला गेलेला आहे यास धरणी नाला असे म्हणतात. अर्ध्या शहराचे सांडपाणी या नाल्यामध्ये उतरविले आहे. सुमारे १ ते १।। कि.मी. चा हा नाला मोहल्ला गल्ली, धरणी चौक, मोठा माळीवाडा, मोची वाडा या मार्गाने गेलेला आहे. या नाल्यात वाहते पाणी कमी तर घाण कचरा जास्त प्रमाणावर असल्याने दुर्गंधीयुक्त नाला म्हणून याची ओळख आहे.या नाल्यात या परिसरातील नागरिक नेहमी टाकाऊ पदार्थ, केरकचरा, खराब भाजीपाला टाकत असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. येता-जाताना तर तोंडावर रूमाल ठेवूनच जावे लागत असल्याने या परिसरात राहणार्या नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.अपघातग्रस्त नालाशहरातील धरणीनाला हा उघडा व खोलगट आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला रहदारीचा रस्ता आहे. परंतु रात्रीच्यावेळी या परिसरात काही भागात अंधार असल्याने अधून -मधून सायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक, लहान मुले नाल्यात पडत असल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त नाला म्हणून याची ओळख आहे. सध्या डेंग्यू रोगाची लागण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात धरणी नाल्याचा परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे डास व मच्छरांचे वास्तव्य वाढलेले दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत दखल घेणे जरुरीचे आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी या नाल्यात घाण, टाकाऊ पदार्थ, केरकचरा टाकण्यावर निर्बंध करावा व आपला परिसरत स्वच्छ ठेवावा हे तितकेच महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)