Dhiraj Sahu On Income Tax Raid: आयकर विभागाच्या छापेमारीत (Income Tax Raid) काँग्रेसखासदार धिरज साहू (Dhiraj Sahu) यांच्याकडे 350 कोटींहून अधिक रोकड सापडल्याची घटना घडली. या प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, या पैशांबाबत धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा माझा पैसा नाही, काँग्रेसचाही याच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत.
आयकर विभागाच्या (आयटी) छाप्याबाबत (Income Tax Raid) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धिरज साहू म्हणाले की, 'जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये काँग्रेस (Congress) किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचा पैसा नाही. त्यांची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या पैशाशी माझाही संबंध नाही, हा माझ्या कुटुंबाचा पैसा आहे.'
'आमचे कुटुंब खूप मोठे आहे, त्यामुळे हा सगळा पैसा कुटुंबाचा आहे. जप्त केलेले पैसे माझ्या फर्मचे आहेत, हे मी मान्य करू शकतो. जप्त केलेली रोकड माझ्या मद्य फर्मची आहे, पण सगळा पैसा माझा नाही, तो माझ्या कुटुंबाचा आणि माझ्याशी संबंधित कंपन्यांचा आहे. मी प्रत्येक पैशाचा हिशेब देईन,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पीएम मोदींनी मारला होता टोमणाया छाप्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली होती. 'देशवासीयांनी या नोटांचा ढिग पाहा आणि मग काँग्रेस नेत्यांच्या प्रामाणिकपणाची भाषणे ऐका. जनतेकडून जे काही लुटले, त्यातील एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदीची गॅरंटी आहे,' असं पीएम म्हणाले होते.