धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 04:01 PM2024-07-04T16:01:09+5:302024-07-04T16:01:45+5:30

Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

dhirendra krishna shastri birthday lakhs of devotees came to bageshwar dham to wish | धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली आहे.

०४ जुलै रोजी धीरेंद्र शास्त्री यांची वाढदिवस साजरा करण्यासाठी देशभरातून लाखो लोक मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे पोहोचले आहेत. बाबांच्या भक्तांची मोठी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली असून जवळपासच्या चार जिल्ह्यांतून फौजफाटा मागवला आहे.

याबाबत माहिती देताना छतरपूरचे एसएसपी आगम जैन यांनी सांगितले की, बागेश्वर धाममध्ये २५० ते ३०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अन्य जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. रीवा, पन्ना, टिकमगड आणि सागर या चार जिल्ह्यांतील पोलीस दलाला पाचारण करण्यात आले आहे. हाथरस दुर्घटनेची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत, भाविकांनी बागेश्वर धाम येथे गर्दी करू नये. घरीच राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म ०४ जुलै १९९६ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. कथांसह 'दिव्य दरबार' भरवण्यासाठी धीरेंद्र शास्त्री ओळखले जातात. या दरबारात बागेश्वर धाम महाराज भाविकांच्या मनातील विचार जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा दावा करतात. बागेश्वर धामचे ते पीठाधीश्वर आहेत.
 

Web Title: dhirendra krishna shastri birthday lakhs of devotees came to bageshwar dham to wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.