Bageshwar Dham : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी साई बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. विविध राजकीय पक्षांसह, संघटना त्यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवत आहेत. अशातच केंद्र सरकारने त्यांची सुरक्षा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने याला मान्यता दिली असून काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. Y सुरक्षेत एक किंवा दोन कमांडो असणार आहेत. व्हाय सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या ताफ्यात पोलिसांसह आठ जवानांचा समावेश असतो.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्या कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. अमर सिंह नावाच्या व्यक्तीने शास्त्री यांच्या काकांच्या मुलाला धमकीचा फोन केला होता. फोन करणार्याने 'धीरेंद्र शास्त्री यांनी कुटुंबीयांसह तेराव्याची तयारी करावी' असे सांगितले होते. या कॉलनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला.