उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने कथितपणे बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. या संदर्भात आचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'शाहजहांपूर जिल्ह्यातील डभौरा गावातील रहिवासी इर्शाद हुसैन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती, अशी माहिती मंडळ अधिकारी प्रियांक जैन यांनी दिली.
स्थानिक विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेश शर्मा पप्पू यांनी ही पोस्ट अश्लील आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याची तक्रार दाखल केली. आयपीसीच्या कलम १५३ए, २९५ए आणि ५०५(२) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग
काही दिवसापूर्वी धीरेंद्र शास्त्री पाटण्यात असताना वादात सापडले होते. पाटणा येथील नौबतपूरमध्ये ते प्रवास करत असलेल्या वाहनाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार मनोज तिवारी आणि धीरेंद्र शास्त्री यांनी १३ मे रोजी पाटणा विमानतळावरून गांधी मैदानात जाताना सीट बेल्ट लावला नव्हता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे.
हे लोक ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीच्या मालकाच्या नावाने हे चलन जारी करण्यात आले आहे. ही कार मध्य प्रदेशची असल्याचे सांगण्यात येत आहे. धीरेंद्र शास्त्री १३ मे रोजी हनुमंत कथा सांगण्यासाठी येथे पोहोचले होते.