शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

Dhirendra Shastri Video : बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला पतीच्या खुनाचा खुलासा; दिव्य दरबारात ढसाढसा रडू लागली महिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 2:08 PM

Dhirendra Shastri Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या चमत्कारांमुळे देशभरात खूप चर्चेत आले आहेत. त्यांच्या चमत्काराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

Bageshwar Dham : गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या चमत्कारांमुळे देशभरात खूप चर्चेत आले आहेत. त्यांच्या चमत्काराचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता परत एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी एका महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या म्हटले आहे, पण महिलेला संशय आहे की, तिच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे महिलेने गेल्या 4 वर्षांपासून आपले केसही धुतलेले नाहीत. ही महिला धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य दरबारात जाते. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री लोकांमधून याच महिलेला हाक मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

ती महिला धीरेंद्र शास्त्री यांच्या जवळ येते, यावेळी तिने आपल्या पतीचा फोटोही सोबत आणला आहे. महिला स्टेजवर आल्यावर धीरेंद्र शास्त्री कागदावर त्या महिलेविषयी काहीतरी लिहितात. यानंतर शास्त्री महिलेला सांगतात की, तिला तिच्या पतीचे रहस्य कळले आहे. तिच्या पतीची हत्या झाली आहे आणि याला आत्महत्या म्हटले जात आहे. तिच्या आसपास शत्रू फिरत आहेत. तिच्या शरीरातही काही समस्या झाली आहे. तिच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. जोपर्यंत गुपित उघड होत नाही आणि सीआयडी तपास होत नाही, तोपर्यंत केस धुणार नसल्याचा पवित्रा तुम्ही घेतला आहे, अशी माहिती धीरेंद्र शास्त्री देतात.

हे ऐकून ती महिला ढसाढसा रडायला लागते आणि 4 वर्षांपासून तिने केस धुतले नसल्याची कबुलीही देते. यावेळी ती बांधलेले केस उघडून सर्वांसमोर दाखवतेही. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महिलेला सांगतात की, या प्रकरणाची CID चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल. यानंतर ते महिलेला म्हणतात की, सध्या तुमचे केस धुवू नका, जर हनुमानजींची इच्छा असेल तर तुमचे केस लवकरच धुण्याची वेळ येईल. यानंतर ती महिलेला निघून जाते.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल