धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज स्मृतिदिन. धीरुभाई भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. त्यांचे विचार आज अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी वेगळं करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यांची काही प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे सांगता येतील.
धीरुभाई अंबानी यांचे विचार
1) जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल. - धीरूभाई अंबानी
2) जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही. त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा. - धीरूभाई अंबानी
3) भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे. - धीरूभाई अंबानी
4) खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात. - धीरूभाई अंबानी
5) जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात, त्यांच्यासाठी पूर्ण जग आहे जिंकायला. - धीरूभाई अंबानी
6) भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की, ते मोठा विचार करायचे विसरून गेले आहेत. - धीरूभाई अंबानी
7) मला 'नाही' हा शब्द ऐकू येत नाही. - धीरूभाई अंबानी
8) काहीतरी मिळवण्यासाठी विचारपूर्वक धोका पत्करावा लागतो. - धीरूभाई अंबानी
9) एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Reliance चे कर्मचारी आणि शेअर धारक याला चालवतच राहतील. Reliance हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही. - धीरूभाई अंबानी
10) मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये. - धीरूभाई अंबानी
11) आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपल्या महत्त्वाकांक्षा उंच असायला हव्यात. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारतासाठी हेच तर माझे स्वप्न आहे. - धीरूभाई अंबानी
12) फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही. - धीरूभाई अंबानी