धोंड यांच्या बदलीचा आदेश?
By admin | Published: July 03, 2015 11:00 PM
पणजी : भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांची गोव्याहून बदली झाल्याचा आदेश जारी झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटात सुरू झाली आहे. काही आमदारांनीही याला दुजोरा दिला; मात्र पक्षातील दुसरा एक गट धोंड यांची बदली रद्द करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
पणजी : भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांची गोव्याहून बदली झाल्याचा आदेश जारी झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटात सुरू झाली आहे. काही आमदारांनीही याला दुजोरा दिला; मात्र पक्षातील दुसरा एक गट धोंड यांची बदली रद्द करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.धोंड यांच्या कार्यपद्धतीबाबत बहुतेक आमदारांनी तक्रारी केल्या आहेत. धोंड यांची यापूर्वीही एकदा दमण-दिव भागात बदली झाली होती. दोन-तीन वर्षे ते दमण-दिवमध्ये होते. २०१२ साली भाजपला सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा धोंड यांच्याविषयी पक्षात तक्रारी वाढल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही त्यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा कोकण-ठाणे याच एका भागाची जबाबदारी स्वीकारा, असे सांगून गोव्याच्या निरोप घेण्यास जवळजवळ भाग पाडल्याची माहिती मिळाली आहे; मात्र धोंड यांची बदली रद्द करून घेण्याची क्षमता संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे असल्याने येत्या दोन दिवसांत काहीही घडू शकते. (खास प्रतिनिधी)