शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण

By admin | Published: August 29, 2016 1:54 AM

हॉकीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. ध्यानचंद यांची आठवण काढताना मोदी म्हणाले की, ‘१९२८, १९३२ आणि १९३६ ला भारताला आॅलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्ण मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी निर्णायक योगदान दिले आहे.’मोदी म्हणाले, ‘ध्यानचंद खरे देशभक्त होते. एकदा कोलकाता येथे एका सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने ध्यानचंद यांच्या डोक्यावर स्टीक मारली. त्यावेळी सामना संपण्यास केवळ दहा मिनिटे शिल्लक होती आणि ध्यानचंद यांनी त्या वेळेत तीन शानदार गोल केले. यानंतर त्यांनी, मी दुखापतीचा वचपा गोलने काढला, असे सांगितले होते.’दरम्यान, यावेळी रिओ आॅलिम्पिकबाबत बोलताना मोदी यांनी महिला खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले, ‘आॅलिम्पिक पदक जिंकून मुलींनी देशाचे नाव उंचावले आहे. रिओमध्ये आपली कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही यात नक्कीच तथ्य आहे. कित्येकदा असे झाले की, आपल्या अव्वल खेळाडूंना लौकिकानुसार कामगिरी करण्यात यश आले नाही. मात्र, त्याचवेळी अनेक खेळाडूंनी पहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे,’ असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)