नवी दिल्ली : जैश-ए-मोहंमदचा संस्थापक मौलाना मसूद अझर हा मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून, पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात त्याच्यावर नियमितपणे डायलिसिस करण्यात येत आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली.पाकिस्तानी विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद अझर आजारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुषंगाने सूत्रांनी सांगितले की, ५0 वर्षीय मसूद अझरची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू आहे. कुरेशी म्हणाले होते की, माझ्या माहितीप्रमाणे तो (मसूद अझर) पाकमध्ये आहे.
मसूद अझरवर रुग्णालयात डायलिसिस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:17 AM