काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:55 AM2019-04-05T08:55:02+5:302019-04-05T09:00:54+5:30

काँग्रेसच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  

Did Congress obey the promises made to the farmers? - Narendra Modi | काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी 

काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी 

Next

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला असून हा जाहीरनामा निराशाजनक आहे. निवडणुकीतील आश्वासनांचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. काँग्रेसच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली. यावेळी नरेंद्र मोदींनी एअर स्टाईक, शेतकऱ्यांना हमीभाव, रोजगार, काश्मिरमधील परिस्थिती, दहशतवाद आणि राममंदिर यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा केली.  काँग्रेस सत्तेवर असताना देशातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्याची हमी दिली होती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले 'एमएसपी'चे आश्वासन पाळले नाही. त्यासंबंधी एक शब्दही उच्चारला नाही, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

याचबरोबर, काँग्रेसने 2004 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 2009 मध्येही त्यांचेच सरकार आले. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.   

(अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य)

Web Title: Did Congress obey the promises made to the farmers? - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.