नवी दिल्ली : आपण आपली संपत्ती खरोखरच प्रामाणिकपणे जाहीर केली आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने भारतातून परागंदा झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना विचारला आहे. मल्ल्या यांच्या वकिलास न्यायालयाने हा सवाल सुनावणी दरम्यान केला.एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी मल्ल्या यांच्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी न्यायालयात खटला दाखल केला. मल्ल्या यांनी तीन मुलांच्या खात्यावर ४0 दशलक्ष डॉलर हस्तांतरित करून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे, असा आरोप एसबीआयने केला. त्यावर न्या. ए.के. गोयल आणि यू.यू. ललित यांनी वकिलाकडे मल्ल्यांंच्या प्रामाणिकपणाबाबत विचारणा केली.बँकांचे अटर्नी जनरल वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ब्रिटनमधील कंपनी डियागिओ पीएलसीकडून ४0 दशलक्ष डॉलर मिळाल्याचे मल्ल्या यांनी न्यायालयात सांगितलेच नाही. त्यावर न्यायालयाने मल्ल्या यांच्या वकिलास सांगितले की, अटर्नी जनरल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. मल्ल्या यांनी त्यांची संपत्ती खरोखरच प्रामाणिकपणे जाहीर केली आहे का? आपल्या मुलांच्या नावे ४0 दशलक्ष डॉलर हस्तांतरित करून मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे का, याचे उत्तरही सुप्रीम कोर्टास हवे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)वसुली करण्याचे आदेश देण्याची बँकांची विनंतीकर्जवसुलीसाठी बँकांनी मल्ल्या यांच्या विरोधात खटला गुदरल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना आपली सर्व प्रकारची चल-अचल संपत्ती तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यास मनाई करणारा आदेश दिला होता.३ मार्च रोजी बँकांनी न्यायालयात सांगितले होते की, मल्ल्या यांना ब्रिटिश कंपनीकडून मिळालेले पैसे त्यांनी परस्पर आपल्या मुलांच्या खात्यावर हस्तांतरित केले. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालय आणि ऋण वसुली प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग झाला आहे. ही रक्कम वसूल करण्याचे आदेश बँकांनी न्यायालयाकडून मागितले आहेत. या आधी ११ जानेवारीला झालेल्या सुनावणीत मल्ल्या यांना ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.
मल्ल्या यांनी संपत्ती खरोखर प्रामाणिकपणे जाहीर केली का?
By admin | Published: March 10, 2017 5:17 AM