नवी दिल्ली - जर तुम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुमच्या एखा चुकीमुळेही तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असते. जर तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त रोख रकमेमध्ये व्यवहार केला, तर तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते.
प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रारजवळ जर कुणी मोठे कॅश ट्रान्झॅक्शन करत असेल तर त्याची माहिती द्यावी लागते, अशा परिस्थितीत जर तुम्हीही डिजिटलऐवजी कॅश ट्रान्झॅक्शन अधिक प्रमाणात करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. आज आपण जाणून घेऊयात काही अशा ट्रान्झॅक्शनबाबत ज्यामधून तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते.
जर तुम्ही ३० लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची खरेदी रोख रकमेमध्ये केली किंवा विक्री केली तर याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाईल. अशा परिस्थितीत प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे याबाबत चौकशी करू शकतो. तुमच्याकडून या रोख रकमेच्या सोर्सची माहितीही घेतली जाऊ शकते.
जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल रोख रकमेमध्ये जमा करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही एका वेळी क्रेडिट कार्ड एक लाख रुपयांच्या वर जमा करत असाल तर प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे चौकशी करू शकतो. जर तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिकच्या क्रेडिट कार्डचं बिल रोख रकमेमध्ये करत असाल तर तुम्हाला त्याचा सोर्सही सांगावा लागेल.
जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल किंवा म्युच्युअल फंड, डिबेंचर आणि बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करत असाल तर सतर्क राहा. एका आर्थिक वर्षामध्ये यामधील १० लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम ट्रॅक्स विभागाची नोटिस मिळू शकते.
जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये वर्षाला १० लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा करत असाल तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्याकडे या पैशांच्या सोर्सची माहिती मागू शकतो. तुम्ही डिजिटल पद्धतीने पैशांना एफडीमध्ये गुंतवा, त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडे तुमच्या ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड राहील. तसेच तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
ज्या पद्धतीने फिक्स डिपॉझिटमध्ये वर्षाला १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कॅश जमा केला तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते. त्याशिवाय जर तुम्ही कुठलीही बँक किंवा को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये वार्षिक १० लाख किंवा त्यापैक्षा अधिक रक्कम कॅशमध्ये जमा करत असाल तक तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. अशा परिस्थितीत कुठलीही रक्कम जमा करायची असेल तर ऑनलाईन करा, जेणेकरून तुमच्या व्यवहारांची माहिती राहू शकते.