सध्या अयोध्येत रामलला यांच्या प्राणप्रतिष्टेची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एक विशेष उत्साह बघायला मिळत आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, आपण लवकरच अयोध्येला जाऊन रामललांचे दर्शन घेणार आहोत, असे म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, '22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर दिल्ली ते अयोध्या रेल्वे गाड्यांची संख्या अधिक वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते म्हणाले होते की, या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अंतिम निमंत्रण त्यांच्या टीमद्वारे पाठविले जाईल. मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारेच निमंत्रण मिळालेले नाही. माझी सहकुटुंब अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. यामुळे मी 22 जानेवारी नंतर काही दिवसांनी अयोध्येला जाईन.'
प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणासंदर्भात विचारले असता केजरीवाल म्हणाले, 'त्यांचे एक पत्र आले होते. यानंतर आम्ही त्याना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले होते. कुणीतरी व्यक्तीशः निमंत्रण देण्यासाठी एईल अथवा त्यांची टीम येईल. ती तर आली नाही, मात्र त्याचे काही नाही. एवढेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी येणार आहेत आणि यामुळे सुरक्षा व्यवस्था पाहता, तेते केवळ एकाच व्यक्तीला परवानगी आहे. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
एकतर अद्याप फायनल निमंत्रण आलेले नाही. मात्र हरकत नाही, माझी धर्मपत्नी, मुले आणि आई-वडिलांसोबत अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी जाण्याची माझी इच्छा आहे. तर मी सर्वांसोबत तेथे जाईन, असेही केजरीवाल म्हणाले.