ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २४ - डिझेल गाडया मोठया प्रमाणावर प्रदूषण करत असल्यामुळे आता दिल्ली पाठोपाठ बिहारची राजधानी पाटण्यामध्ये डिझेल गाडयांवर बंदी घालण्यात येणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंधरावर्ष जुन्या डिझेल गाडयांवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या फक्त पाटण्यामध्ये मनाई करण्यात आली आहे.
बुधवारी वन आणि पर्यावरण विभागाच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे निर्देश दिले. दिल्लीमध्येही येत्या एक जानेवारीपासून गाडया सम आणि विषम क्रमांकानुसार एकदिवसाआड रस्त्यावर धावणार आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.