लाहोर : पाकिस्तानकडे १२५ ते २५० ग्रॅम इतक्या कमी वजनाची अण्वस्त्रे असून ती अचूक लक्ष्यभेद करतात असा अजब दावा त्या देशाचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी केला आहे. काश्मीरच्या मुद्यावरून दोन्ही देशांतील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अहमद यांनी अण्वस्त्रांबद्दल वक्तव्य करून भारताला धमकी दिली आहे.
शेख रशीद अहमद यांनी पाकिस्तानच्या पंजाबमधील नानकाना साहिब येथे पत्रकारांना रविवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा भारताने रद्द केल्यानंतर त्या देशाशी याआधी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच इतर मुद्द्यांबाबत केलेले करार पाकिस्तानने रद्दबातल केले आहेत. अचूक लक्ष्यभेद करणारी व अतिशय कमी वजनाची अण्वस्त्रे पाकिस्तानकडे आहेत असा इशाराही त्यांनी दिला.
स्थानकाला गुरू नानक यांचे नावनानकाना साहिब येथे बांधण्यात येत असलेल्या रेल्वे स्थानकाला शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे नाव देण्यात येणार आहे असे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी म्हटलेआहे.