मुंबई: अॅप्समुळे खाद्यपदार्थ ऑर्डर करणं अगदी सोपं झालं आहे. मोबाईलवरुन खाद्यपदार्थ मागवताच अवघ्या काही मिनिटांमध्ये ते घरपोच मिळतात. त्यामुळे अनेकांसाठी हे फायदेशीर ठरतं. यामध्ये घरपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणारे डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स महत्त्वाची भूमिका बजावतात. वाहतूक कोंडीतून वाट काढत डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स खाद्यपदार्थ अगदी ग्राहकाच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवतात. गेल्या वर्षी झोमॅटोच्या एका डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्हचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये झोमॅटोचा डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह ग्राहकापर्यंत पोहोचवायचा खाद्यपदार्थ खाताना दिसत होता. यावरुन झोमॅटोवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियानं झोमॅटोचा जोरदार समाचार घेतला. यानंतर झोमॅटोच्या एका डिलेव्हरी बॉयची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुनही डिलेव्हरी बॉयचं काम करावं लागत असल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं होतं.
सलाम! प्रबळ इच्छाशक्तीनं अपंगत्वावर मात; झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 7:47 PM