'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:35 IST2025-02-11T09:29:16+5:302025-02-11T09:35:45+5:30
काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारला एका मुद्द्यावर समर्थन दिले आहे.

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...
काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारच्या एका मुद्द्याला आपले समर्थन दिले आहे. 'पाकिस्तानसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय चर्चा करणे आता शक्य नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारख्या जखमा विसरता येणार नाहीत. आता काहीही घडलेच नाही असे वागणे खूप कठीण आहे',असं शशी थरुर यांनी म्हटले आहे. 'जेव्हा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. अशा परिस्थितीत, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बरोबर म्हटले होते की आता पाकिस्तानशी साधेपणाने चर्चा होऊ शकत नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या या विधानाला आता शशी थरुर यांनी समर्थन दिले आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?
खासदार शशी थरूर म्हणाले की, पाकिस्तानातील लोकांसोबत संवाद वाढवला पाहिजे. पाकिस्तानी लोकांना अधिकाधिक व्हिसा देण्यात यावा. पाकिस्तानातून जो कोणी भारतात येतो, तो आपल्या देशाच्या प्रेमात पडतो. फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शशी थरूर म्हणाले की, संवाद थांबवणे हे देखील धोरण नाही. त्याच वेळी, पठाणकोट आणि मुंबईत पाकिस्तानने केलेले हल्ला कधीही विसरता येणार नाही, असंही थरुर म्हणाले.
एका संसदीय समितीच्या जुन्या अहवालाचा हवाला देत थरुर म्हणाले की, जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये भारताची प्रतिमा सुधारायची असेल तर अधिक लोकांना व्हिसा द्यावा लागेल. आम्ही स्वतः म्हटले होते की पाकिस्तानवर धोरणात्मक पातळीवर विश्वास ठेवता येत नाही, पण जनतेशी संबंध मजबूत करणे आवश्यक आहे. जर भारताने असे केले तर पाकिस्तानमध्येही भारताला पाठिंबा वाढेल आणि तेथील लोक शांततेची मागणी करण्यासाठी पुढे येतील, असंही खासदार शशी थरुर म्हणाले.
जने मुद्दे विसरुन बोलणे शक्य नाही
खासदार शशी थरूर म्हणाले की, असा एकही पाकिस्तानी नाही जो भारतात आला असेल आणि आपल्या देशाच्या प्रेमात पडला नसेल. पर्यटक, गायक, संगीतकार आणि खेळाडू देखील म्हणतात की त्यांना भारतात यायचे आहे. सध्याचे सरकार असेही म्हणते की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही म्हटले होते की, पाकिस्तानशी विनाअडथळा चर्चेची वेळ आता संपली आहे. जर कोणतेही सरकार या मुद्द्याला गांभीर्याने घेत असेल तर पाकिस्तान त्यांना चर्चा संपवण्यास भाग पाडते. चर्चेचा शेवट कायमचा जाहीर करणे शक्य नाही. पण जुने मुद्दे विसरून मित्रांसारखे बोलणे शक्य नाही, असंही खासदार शशी थरुर म्हणाले.