शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अंदाज लावण्यात अडचण; चंद्रयानासाठी पुढचा टप्पा अत्यंत कठीण : इस्रो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 7:38 AM

चंद्रयान-२ मोहिमेचा होतोय फायदा

 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चंद्रयान-२ मोहिमेचा चंद्रयान-३ मोहिमेसाठी मोठा फायदा होत आहे. सध्याची भारताची तिसरी चंद्रयान-३ मोहीम अत्यंत उत्तम स्थितीत चंद्राच्या मार्गावर जात आहे. जेव्हा चंद्रयान १०० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेतून चंद्राजवळ जाण्यास सुरुवात करेल तेव्हा चंद्रयानासाठी त्याचा सर्वांत कठीण टप्पा असेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले.

चंद्रयान-३ हे १४ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. ते सध्या ताशी १७० किमी वेगाने पुढे जात आहे. यान चंद्राच्या आणखी जवळ जाण्याची पुढील प्रक्रिया ९ ऑगस्ट रोजी केली जाईल. १७ ऑगस्टपर्यंत असे दोन प्रयत्न केले जातील. 

यादरम्यान यान चंद्रापासून १०० किमी अंतरावर आणले जाईल. यानंतर चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी उतरविले जाईल, असे त्यांनी सांगितले.

अडचण कुठे येतेय?n आकस्मिक संकटाला सामारे जाण्यासाठी आम्ही अधिक माहिती गोळा केली होती. n यान १०० किलोमीटरवर पोहोचण्यासाठी आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अचूक अंदाज लावण्यात अडचण येत आहे. n हे मोजमाप अतिशय कठीण आहे, त्याला कक्षा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणतो. जर ती बरोबर असेल, तर बाकीची प्रक्रिया करता येईल, असे एस सोमनाथ यांनी सांगितले.

चंद्रयान चंद्रावर उतरविण्यासाठी आम्ही यावेळी सक्षम आहोत. कक्षा बदल नियोजित प्रमाणे होत आहेत. यात कोणतेही विचलन नाही. त्यामुळे चंद्रयान मोहिमेबद्दल कोणतीही शंका नाही. चंद्रयान-२ च्या मोहिमेचा अनुभव आम्हाला येथे फायदेशीर ठरतो आहे.    - एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो