ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात कॅशलेस व्यवहारांकडील कल वाढला आहे. तसेच सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून डिजिटल व्यवहारांसाठी महत्त्वाच्या तरतुदी अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार वाढवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. तसेच भीम आधारित डिजिटल व्यवहारांना चालना देण्यात येणार आहे. तसेच डिजिटल व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेत डिजीटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील डिजिटल व्यवहार संदर्भातील मह्त्त्वाचे मुद्दे
- सरकारी संस्थांमध्ये डिजीटल व्यवहारांना चालना देणार
- आधारच्या माध्यमातून डिजीटल व्यवहाराचे लक्ष्य, यामुळे मोबाईल नसला तरी व्यवहार शक्य
- भीम आधारीत डिजीटल व्यवहारांना चालना देणार
- 20 लाख सर्विस टर्मिनल्स उभारण्याचे उद्दिष्टय
- भीम अॅपच्या प्रमोशनसाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना
- रिझर्व्ह बँकेत डिजीटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करणार