नवी दिल्ली - देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. सरकारचे आर्थिक धोरण, विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन यांच्या दृष्टीने जनगणना महत्त्वपूर्ण ठरते. दरम्यान आपल्या देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही माहिती दिली. अमित शहा यांच्याहस्ते आज दिल्लीत जनगणना भवनाची पायाभरणी झाली. त्यावेळी 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेबाबतची माहिती अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले की, ''2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर होणार आहे. यामध्ये सर्व आकडेवारी डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. जेवढ्या सुक्ष्म पद्धतीने जनगणना होईल. तेवढीच देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मदत मिळणार आहे.''
डिजिटल इंडिया : मोबाइल अॅपवरून होणार 2021 ची जनगणना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:54 PM