शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

डिजिटल इंडियाने बदलेल भविष्य!

By admin | Published: November 14, 2016 1:33 AM

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीआधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे. नऊ स्तंभावर उभ्या असलेल्या या उपक्रमात विविध सेवांचा अंतर्भाव आहे. त्याचे सारथ्य भारताची गुणवत्ता (इंडियन टॅलंट= आयटी)+ माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी = आयटी)+भविष्यातला भारत (इंडिया टुमारो = आयटी) हे तीन आयटी करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत तेबोलत होते.डिजिटल इंडिया ज्या ९ स्तंभावर उभा आहे, त्यात ब्रॉडबँड हायवे, युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट सेवा, ई-शासन, तंत्रज्ञान आधातित सरकारी सुधारणा, ई क्रांतीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा, सर्वांसाठी माहिती, शून्य आयातीच्या लक्ष्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात वृद्धी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारवाढ व आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला पूरक अद्ययावत माहिती पुरवणे या कार्यक्रमांचा समावेश आहे.मायगव्ह हे भारत सरकारचे ई-शासनासाठी नागरिक भागीदारीचे व्यासपीठ आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वसामान्य लोक या प्लॅटफॉर्मवर सूचना कळवू शकतात. त्यावर ३७ लाखांहून अधिक लोकांनी आपली नोंदणी केली आहे. शोध व संशोधनासाठी ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म (ओजीडी)आहे. त्यात विविध प्रकारचे डेटाबेस अ‍ॅक्सेस करता येतात. जीवन प्रमाण ही देशातल्या पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट देणारी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक डिजिटल व्यवस्था आहे. मौल्यवान दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर्स सुविधा आहे. त्याचा लाभ २७ लाख लोकांनी घेतला असून ३२.२४ लाख दस्तऐवज सुरक्षितपणे त्यावर अपलोड झाले आहेत, असे ते म्हणाले.