शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जमाना डिजिटलचा : लॅपटॉप, माऊस, हेडफोन झाली निवडणूक चिन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:10 AM

जमाना डिजिटलचा : अपक्ष, नव्या पक्षांसाठी १९८ पर्याय उपलब्ध

मुंबई : अपक्ष उमेदवार आणि नव्या पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर असलेला ग्रामीण जीवनाचा पगडा यंदा दूर झाला असून निवडणूक आयोगाने तब्बल १९८ पर्याय उपलब्ध करून दिली आहेत. त्यात डिजिटल साधनांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा उखळ, धान्य पाखडण्याचे सूप, दळणाच्या जात्यापासून लॅपटॉप, पेनड्राइव्ह, माऊस, हेडफोन, रोबोट आदी चिन्ह म्हणून उपलब्ध असणार आहेत.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष तसेच अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षाच्या अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह देण्यात येते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८७ मुक्त चिन्हे निश्चितकेली होती. यंदा यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांसाठी चिन्हे राखीव चिन्हे वगळून तब्बल

१९८ मुक्त चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध असणार आहेत.दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत तसेच दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, क्रीडा साहित्य, कृषी- बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशी चिन्हे यंदाही असणार आहेत.हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेशमुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे.स्वयंपाकघरच अवतरलेगॅस सिलिंडर, गॅस शेगडी, रेफ्रीजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्रार्इंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlaptopलॅपटॉप