दिग्विजय सिंह यांनी केलं नरेंद्र मोदी आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:03 IST2025-02-28T17:01:31+5:302025-02-28T17:03:33+5:30
Digvijay Singh News: दिग्विजय सिंह यांनी नुकतंच दिग्विजय सिंह यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केल्याने सारेच अवाक् झाले आहेत.

दिग्विजय सिंह यांनी केलं नरेंद्र मोदी आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं कौतुक, म्हणाले...
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे त्यांच्या कडवट हिंदुत्वविरोधी भूमिका आणि नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र दिग्विजय सिंह यांनी नुकतंच दिग्विजय सिंह यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदी आमि बागेश्वर बाबांच्या केलेल्या कौतुकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात त्याची कुतुहलपूर्वक चर्चा होत आहे. तसेच नेटकरीही दिग्विजय सिंह यांच्या भूमिकेवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेले दिग्विजय सिंह इंदूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, बुंदेलखंड येथे कॅन्सर रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना खूप शुभेच्छा देतो. अशा प्रकारचं काम हे मानवाच्या सेवेच्या माध्यमातून ईश्वराच्या सेवेचं प्रतीक आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये गरीबांच्या मदतीसाठी सनातन धर्म हा राजमार्ग आहे. जर अशा संस्थांवर लक्ष दिलं तर त्यांचा प्रभाव दिसून येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांचं हे वक्तव राजकीय वर्तुळासोबतच सोशल मीडियावर वावरणाऱ्या नेटीझन्ससाठीही आश्चर्याचा धक्का देणारं ठरलं आहे. त्याचं कारण म्हणजे नेहमी हिंदुत्ववादी संघटना, भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर परखड टीका करणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी मोदी आणि बागेश्वर धाममधील बाबांची स्तुती करणं त्यांना अविश्वसनीय वाटत आहे.