नवी दिल्ली : फ्रान्समधून अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी बुधवारी भारतात येणार आहेत. ही विमाने हरियाणाच्या अंबाला येथील हवाई दलाच्या तळवरील उतरतील. पुढील महिन्यात विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे. मात्र, भारतीय हवाई दलात सामील होणाऱ्या या विमानावरून केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
राफेलच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल डीलच्या तपशिलांबाबत दिग्विजय सिंह यांनी पुन्हा सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आता या डीलची किंमत सांगितली पाहिजे.
दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केले. यामध्ये ते म्हणाले, "अखेर राफेल लढाऊ विमान आले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएने २०१२ मध्ये १२६ राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. १८ राफेल वगळता भारत सरकारच्या एचएएल (हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड) मध्ये निर्मिती करण्याची तरतूद होती. हे भारतात आत्मनिर्भर होण्याचे प्रमाण होते.
एका राफेलची किंमत ७४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर मोदींनी संरक्षण आणि वित्त मंत्रालय आणि कॅबिनेट समितीच्या परवानगीशिवाय फ्रान्ससोबत नवीन करार केला आणि एचएएलचा अधिकार काढून खासगी कंपनीला देण्याचा करार केला. राष्ट्रीय सुरक्षाकडे दुर्लक्ष करून, १२६ राफेल खरेदी करण्याऐवजी केवळ ३६ खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, "एका राफेलची किंमत काँग्रेस सरकारने ७४६ कोटी रुपये निश्चित केली होती, परंतु संसदेत आणि संसदेच्या बाहेरही अनेकवेळा मागणीकरूनही 'चौकीदार' महोदय आतापर्यंत राफेलची खरेदी किती रुपयांना केली, हे सांगण्यास टाळाटाळ करत आहेत, का? कारण, 'चौकीदार'ची चोरी उघडकीस येईल !! 'चौकीदार'जी, आता त्याची किंमत सांगा!!", असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला केला.
आणखी बातम्या...
रियाने सुशांतच्या अकाऊंटमधून एका महिन्यात १५ कोटी काढले, वडिलांचा गंभीर आरोप
लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे...
"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित