भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी रविवारी ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले, "काँग्रेसनेज्योतिरादित्य शिंदे यांना काय दिले नाही? पण आज तो रंगमंचावरुन मोठमोठ्या गोष्टी बोलत आहे. काँग्रेसवर आरोप. ही चुकीची गोष्ट आहे. राजकारणातही काही मर्यादा असतात. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वार्थासाठी आधी मध्य प्रदेशात सरकार पाडले आणि आता ते काँग्रेसला दोष देत आहेत."
याचबरोबर, दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या सदस्य अभियानाला लक्ष्य केले. "धार्मिक कार्यक्रम, गणेश मंडप उभारण्यास करण्याची परवानगी नाही, परंतु भाजपाचे लोक मंडप घालू शकतात. यावरून जाहीर होते की, भाजपाचे हिंदुत्व म्हणजे काय?", असा सवाल करत चंबळ विभागातून ज्यातिरादित्य शिंदे गेल्याने काँग्रेस जिवंत झाली आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
आज मला या गोष्टी बोलण्यास आणि दाखविण्यास भाग पडले आहे. कारण कालपासून ज्योतिरादित्य शिंदे मोठ्या गोष्टी आणि आश्वासने देत होते. काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना काय दिले नाही? काँग्रेसने सर्व काही दिले, असे दिग्विजय सिंह म्हणाले. याशिवाय, ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे खास असल्याचे मानले जात होते. पक्ष सोडण्याची त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. पक्ष सोडल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे अशी भाषणे करीत आहेत आणि काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. लोकशाही लोकांच्या विश्वासाचा एक प्लॅटफॉर्म असतो, विश्वास बसत नाही, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.