शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
4
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
5
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
6
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
7
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
8
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
9
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
10
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
11
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
12
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
13
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
14
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
15
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
16
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
17
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
18
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
19
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:42 IST

Law Commission Chairperson: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित २३व्या विधी आयोगाच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले. 

नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची २३व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली, तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य नेमण्यात आले आहे.पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित २३व्या विधी आयोगाच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले. 

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन आणि वाराणसी हिंदू विद्यापीठाचे प्रोफेसर डी. पी. वर्मा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

२३व्या आयोगाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे. २२व्या विधी आयोगात अध्यक्षांसह सहा सदस्य होते. परंतु, २३व्या आयोगात अध्यक्षांसह केवळ तीन सदस्य आहेत ही विशेष बाब आहे.

घटाटे होते १७व्या विधी आयोगाचे सदस्य

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता डॉ. एन. एम. घटाटे यांची १७व्या विधि आयोगाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. घटाटे १६व्या आयोगातही सदस्य होते.  

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब अशी की, तब्बल २२ वर्षांनंतर विधि आयोगात सदस्य म्हणून राज्यातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

लंडनच्या स्कूल आफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कॉर्पोरेट कायद्यांमध्ये एलएलएम पदवी मिळविणारे पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य नेमण्यात आले आहे.

ते ज्येष्ठ अधिवक्ता एस. के. जैन यांचे चिरंजीव होय. ३० वर्षांच्या कार्यकाळात हितेश जैन यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले लढविले आहेत. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी