ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - रेल्वे प्रवाशांना अवघ्या २० रुपयांमध्ये स्वच्छ व दर्जेदार जेवण देण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली आहे. खाण्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल रेल्वेच्या कॅटरिंग सेवेला अनेकवेळी टीकेला सामोरे जावे लागते. परंतु, आता रेल्वे मंत्रालयाने देशभरातल्या अनेक रेल्वे स्थानकांमध्येजन आधार कॅफेटेरिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून अवघ्या २० रुपयांमध्ये दर्जेदार जेवण देण्याची हमी घेतली आहे. तसेच, पिण्याचे शुद्ध पाणी मोफत असेल आणि जेवताना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागणार नाही असादावाही करण्यात आला आहे.
कसे असेल जन आधार कॅफेटेरिया
- २४ तास सुरू राहील आणि सेल्फ सर्व्हिस प्रकारात मोडेल.
- जनता मील, इकॉनॉमी मिल व स्थानिक पदार्थ मिळणार.
- बहुतेक सर्व पदार्थ २० रुपयांपेक्षा कमी कमितीत मिळतिल.
- सगळे कॅफेटेरिया एअर कंडिशन्ड असतिल आणि जिथे तिकिट अनिवार्य आहे, अशाच भागात असतिल, ज्यामुळे केवळ रेल्वेच्या प्रवाशांनाच लाभ मिळेल.
- विविध प्रकारची आईस क्रीम ठेवण्यात येतील.
- पिण्याचे शुद्ध पामी मोफत असेल.
- स्वयंपाकघराचा भाग काचेच्या पडद्यामागे असेल, ज्यामुळे बाहेरुनही आतमधली स्वच्छता प्रवाशांना दिसेल.