शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 7:43 AM

Manmad to Indore Railway: मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

नवी दिल्ली -  मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हा प्रकल्प २०२८-२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईपासून इंदूरपर्यंतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे. 

या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढणार आहे. वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकल्पाला पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली आहे.

मालवाहतूक हाेणार सुलभनव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर, खते, लोहखनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल. 

फायदा काय?महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जातील. त्या भागात दळणवळण वाढणार.  मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.मनमाड-इंदूरमधील नवीन रेल्वेमार्गामुळे पर्यटनवाढीलाही मदत. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदौर परिसरातील पर्यटनस्थळांना फायदा होईल. 

इंदूरसाठी सध्या लांबचा प्रवास - मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी सध्या दाेन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे, मुंबई सेंट्रल येथून पश्चिम रेल्वेने रतलाम, नागदा, उज्जैन व इंदूर असा ८२८ किलाेमीटर लांबीचा मार्ग. - दुसरा पर्याय म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून भाेपाळमार्गे इंदूर गाठणे. त्यासाठी भाेपाळ येथे ट्रेन बदलावी लागते. हे एकूण अंतर १,११० किलाेमीटर आहे.- नवा मार्ग जवळपास ६०० किलाेमीटर एवढा आहे. त्यामुळे किमान ४ तास वाचणार आहेत.

उद्योगांनाही लाभपीथमपूर ऑटो क्लस्टर हे या रेल्वेमार्गाद्वारे मुंबईजवळील जेएनपीए बंदर व अन्य राज्यांतील बंदराशी जोडले जाईल. पीथमपूर ऑटो क्लस्टरमध्ये ९० मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेश