ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. १४ - जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानल्या जाणा-या तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमधील महाकाल मंदिराचेही डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे. त्या अकाऊंटद्वारे जगभरातील भाविकांना महाकाल मंदिरात शेअर दान करता येणार आहेत.
सध्या भाविक ऑनलाइन वा मंदिरात नगद रक्कम वा सोने-चांदी आदी गोष्टी दान करतात. मात्र डिमॅट अकाऊंटच्या सहाय्याने भक्तांना या रकमेचे धनादेश व शेअर डिमॅट अकाऊंटद्वारे दान करता येणार आहेत.
मंदिर प्रशासनाला ज्या बँकेत अकाऊंट उघडायचे आहे तेथे त्यांना प्रथम एक अर्ज द्यावा लागेल व त्यानंतर अकाऊंट उघडण्यासाठी प२नकार्ड नंबक, अॅड्रेस प्रुफे, मंदिराच्या विश्वस्त समिती महत्वाची कागदपत्रे यांची फोटोकॉपी जमा करावी लागेल. त्यानंतर बँक मंदिराच्या समितीच्या नावाने अकाऊंट उघडून देईल. या अकाऊंटमुळे सर्व भक्त शेअर्स, बाँड वगैरे सहजरित्या ट्रान्सफर करून मंदिरात दान करू शकतील. व मंदिराची विश्वस्त समिती हे शेअर्स वगैरे विकून रोख रक्कम मिळवेल.
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे मध्यप्रदेधील प्रमुख व सरकारी मंदिरापैकी एक महत्वाचे मंदिर असून दरवर्षी मंदिराच्या दानपेटीत करोडो रुपये जमा होतात. तसेच सोने-चांदी व इतर किमती वस्तू दान म्हणून येतात.